कॉफी

कॉफी

तसं पहायला गेलो तर आपणा भारतीयांचे अगदी आवडते पेय म्हणजे चहा. कित्येकांची सकाळ सूर्य उगवला म्हणून होत नसेल पण या चहामुळे नक्कीच होते. आपल्या तनामनात आणि संस्कृतीमध्ये भिनलेल्या या चहाला तोड नाहीच.

तरीही या चहाला मावसबहीण शोधावी अशी ही ‘कॉफी’ आपल्याकडे आवडीने प्यायली जाते.सुरवातीला ही कॉफी मात्र उचभ्रू कुटुंबातील वाटायची . पण आता तिने आपला सारा अहंकार आणि बडेजावपणा सोडला आहे आणि साध्या सामान्य माणसांच्या घरातही ती चहा सोबत गुण्या गोविंदाने नांदत आहे.

टेबलावर ठेवलेल्या साध्या चिनीमतीच्या कपात जेव्हा या कॉफीचे अवतरण होते तेव्हा त्या कपाला जणू नवचैतन्य प्राप्त होते. आणि तेच चैतन्य आपल्या मुखावाटे पोटात आणि नन्तर इंद्रियांच्या राजाला राजाला म्हणजेच मनाला प्राप्त होते. थोडक्यात मनाला आणि शरीराला तरतरी येते. अशी ही रंजक कॉफी आणि त्या कॉफीचा भारतात येण्याचा, नंदण्याचा इतिहास ही रंजक आहे बरं का…..

sandesh.k0101

sandesh.k0101

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *